जळगाव प्रतिनिधी । गिरणी नदी पात्रातील अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू माफियांनी अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी पाच जणांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करीत असलेल्या ३० ते ४० तस्करांनी येऊन तहसीलदारांच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी शनिवारी (२५ जानेवारी) तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. यानंतर पोलिसांनी नंदू भगवान कुंभार व अजय शंकर सपकाळे या दोघांना अटक केली होती. दोघांची चौकशी केल्यानंतर मंगळवारी जितेंद्र भिमराव सोनवणे, आनंदा सखाराम नन्नवरे, विनोद जययिंग गोरखा, प्रशांत गणेश वानखेडे व रुपेश प्रकाश सैंदाणे या पाच जणांना अटक केली. मंगळवारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सपोनि गणेश चव्हाण तपास करीत आहेत.