पिंप्री खुर्द ता. धरणगाव । चिंचपुरा येथे मेंढपाळांना संचारबंदी असल्याने किराणा उपलब्द होत नसल्याने जिजाऊ महीला शेतकरी बचत गटातर्फे मेंढपाळांना किराणा वाटप करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांतर्फे मदत केली जात असतांना शासनाने देखील त्यांना मदत करावी असे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजवर प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल प्रशासनाने घेऊन या मेंढपाळांना किराणा सामानाचे वाटप केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने गरीब लोकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात चिंचपुरा येथील मेंढपाळांना देखील मदतीची गरज होती. या वृत्ताची दखल घेत धरणगावाचे तहसिलदार देवरे , ना . तहसिलदार मोहोळ , एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्यातर्फे शासनाच्यावतीने मेंढपाळांना किराणा सामान तसेच अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .