Home क्राईम तळेगाव येथून तीन गायी चोरीला

तळेगाव येथून तीन गायी चोरीला

0
27

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव येथील एकाच्या शेतातील पत्री शेडमधून ५० हजार किंमतीच्या  तीन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली असून याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुधाकर बाबुराव काटकर ( वय- ७२ रा. तळेगाव ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेती हा व्यवसाय असल्याने शेतात एक पत्री शेड उभारण्यात आले आहे. त्यात गुरेढोरे हे बांधलेले असतात. शनिवार सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास काटकर हे जनावरांना चारा पाणी करून घरी झोपण्यासाठी निघून गेले. रविवार रोजी सकाळी ६ वाजता काटकर हे गायीचे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता २० हजार किंमतीची काळ्या रंगाची गाय, २० हजार किंमतीची तपकिरी रंगाची गाय व १० हजार किंमतीची तपकिरी रंगाची गाय असे एकूण ५०,०००. हजार रुपये किंमतीची तीन गायी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट होताच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन अमोदकर हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound