तळेगाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधकांत हाणामारी

 

 जामनेर, प्रतिनिधी ।तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच विकास कामासंदर्भात दुसऱ्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्या बैठकीत सत्ताधारी व विरोधक यांची विकास कामावरून एकमेकांमध्ये हाणामारी होऊन जामनेर पोलिसात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करून आपसात तडजोड करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  गावातील मुख्य रस्त्यावरील व डॉ. एम. बी. चौधरी त्यांच्या दवाखान्यात जवळील गटारीवरील धापा तुटल्यामुळे ग्रामस्थांना व दवाखान्यातील पेशंट यांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विरोधी सदस्य नंदू भागवत पाटील यांनी ग्रामसेवक यांना त्याकामाबद्दल विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीकडे कोणताही निधी उपलब्ध नाही त्यामुळे मी स्वतः दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून ढाप्याचे काम करावे व ग्रामस्थांना होणारा त्रास टाळावा. मात्र विरोधी सदस्यांचे काम करायचेच नाही त्यामुळे  उपसरपंच राहुल वाघ व नंदू पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. तसेच पाचोरा पंचायत समितीचे सिव्हिल इंजिनियर (अभियंता) यांचा ग्रामपंचायतीमध्ये काहीएक अधिकार नसताना व भाऊ उपसरपंच असल्यामुळे ग्रामसेवक व इतर सदस्यांवर दबाव टाकुन मनमानी कारभार करीत आहे. प्रशांत वाघ यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे ग्रामपंचायतचा वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यानंतर जामनेर पोलीसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला . दोघांवरही राजकीय दबाव आल्यामुळे आपापसात गुन्हा मिटवण्यात आले. ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे. विकास कामे करा भांडणे करू नका. आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे विकास कामासाठी भांडणासाठी नाही असे सुज्ञ नागरिक बोलत आहे.

 

Protected Content