जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार असलेला हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला खंडेराव नगरातून पोलीसांनी अटक केली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात आर्मऍक्ट नुसार गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील राजीव गांधी नगरातील रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी हा (वय-२५) हा तरुण वास्तव्यास असून गेल्यावर्षी त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तरी देखील तो कुठलीही परवानगी न घेता हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन सोमवारी २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शहरातील खंडेराव नगरात हातात तलवार घेवून दहशत माजवित होता. हा प्रकार रामानंदनगर पोलिसांना कळताच त्यांनी खंडेराव नगरात धाव घेवून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्याविरुद्ध ऑर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.