नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून नशिराबाद गावाजवडील देव्हारी येथे एका तरुणासह कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात मंगळवारी ३० मे रोजी रात्री ९ वाजता दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल भगवान पाटील (वय-३२) रा. देव्हारी ता.जि.जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ३० मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा रावसाहेब उर्फ गोलू रघुनाथ तायडे रा. देव्हारी ता.जि.जळगाव आणि नितीन उर्फ सोनू नामदेव पाटील रा. उमाळा ता.जि. जळगाव या दोन जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तर तलवारीचा धाक दाखवत कुटुंबाला शिवीगाळ करत जीवेठार मानाची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता संशयित आरोपी नितीन पाटील आणि रावसाहेब तायडे या दोघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.