Home आरोग्य …तर शासकीय विश्रामगृहांमध्येही होणार रूग्णांची व्यवस्था-ना. चव्हाण

…तर शासकीय विश्रामगृहांमध्येही होणार रूग्णांची व्यवस्था-ना. चव्हाण

0
22

मुंबई प्रतिनिधी । वेळ पडलीच तर शासकीय विश्रामगृहे आणि वसतीगृहांमध्ये रूग्णांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग सध्या तरी आटोक्यात दिसत असला तरी परिस्थिती केव्हाही चिघळू शकते. या पार्श्‍वभूमिवर, सरकारतर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. या अनुषंगाने ना. अशोक चव्हाण म्हणाले की, करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला असून, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या कानाकोपर्‍यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. याठिकाणी वीज, पाणी अशा सुविधाही उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापरही सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी आवश्यक त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती ना. चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound