…. तर माझा नवरा आज जिवंत असता — अक्षता नाईक

मुंबई : वृत्तसंस्था । ”फक्त अर्णब गोस्वामीमुळे त्यांना (अन्वय नाईक) पैसे मिळाले नाहीत. मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे,” अशी टीका करत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अर्णब गोस्वामीकडून मानसिक त्रासाचा आरोप केला.

अन्वय नाईक आत्महत्या रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तीन लोकांची नावं माझ्या नवऱ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. एआरजी आउट लायर शेवटचा प्रोजेक्ट होता. पण, फक्त अर्णब गोस्वामीमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. अर्णब गोस्वामीसारख्या माणसांची ही मानसिकता आहे. जे कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते कोणत्याही नागरिकाने याला न्याय देऊ नये. आम्ही सुशांत सिंह राजपूत नाही,”अशी टीका अक्षता नाईक यांनी केली.

“अर्णब गोस्वामी हे माझ्या वडिलांना वारंवार धमक्या देत होते. पैसै तुला मिळणारच नाही. जे मिळालेत ते पण मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईन. त्यावेळी यावरून आमची चर्चाही झाली होती की, पोलिसांत तक्रार करू. पण त्यांना मुलीचं करिअरही उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. सातत्यानं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. आमच्या इतर ग्राहकांनाही अर्णब गोस्वामी यांनी पैसे न देण्यास सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायच उरला नव्हता,” अशी माहिती नाईक यांच्या कुटुंबीयांनी दिली

 

“सूडबुद्धीनं त्यांनी हे केले. त्यांनी रडवून रडवूनही स्टुडिओच्या कामाचं बजेट कमी केलं. पण, तेही पैसे दिले नाहीत. ८३ लाख रुपये खर्च स्टुडिओवर करण्यात आला आहे. यापैकी काहीही पैसे देण्यात आले नाही. त्यांचं हे शेवटचं प्रॉजेक्ट होतं. मार्केटमध्ये दुसरी कामं घेण्यासाठी पैसे नव्हते,” असा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Protected Content