
अहमदनगर (वृत्तसंस्था) तृप्ती देसाई यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अकोल्यात येऊन दाखवावे, त्यांचे मुंडन करुन परत पाठवू, अशी धमकी अकोल्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी धमकी दिली आहे.
कीर्तनकार इंदूरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी स्मिता आष्टेकर यांनी इंदूरीकर महाराजांच्या समर्थकांना संबोधित करताना तृप्ती देसाईंवर टीका केली. तसेच तृप्ती देसाई यांनी कालही नगर जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा फौजफाटा घेऊन आल्या होत्या. आता सांगते दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू, असे स्मिता आष्टेकर म्हणाल्या. दरम्यान, स्मिता आष्टेकर यांनी याअगोदरही सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांच्यावर टीका करत अहमदनगरमध्ये येऊन दाखवण्याचं आव्हान दिले होते.