भुसावळ प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका २० वर्षीय तरूणीवर अत्याचार करून विष देवून खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीचे निवेदन भाजपातर्फे तहसीलदार यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील टोळी येथील २० वर्षिय तरुणीवर तीन नराधमांनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला विष पाजून घातपात केल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मनाला चटका देणारी आहे. या घटनेतील नराधमांना त्वरित अटक होऊन मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत हीस न्याय द्यावा. अशा घटना घडणे म्हणजे विकृत, क्रूर मानसिकतेवर कायद्याची वचक नाही असे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र व या महाराष्ट्रात अश्या महिला अत्याचार होत असतील तर महाराष्ट्रात माहिल्या कोणत्या सुरक्षित आहेत? असा प्रश्न मनात येतो. या कडे महाराष्ट्र शासनाने गांभीयाने लक्ष देण्याची गरज आहे.
निवेदनावर महिला आघाडी अध्यक्षा शैलजा पाटील, शहराध्यक्षा मिना लोणारी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रंजनी सावकारे, युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सुनिल महाजन, सोनल महाजन, दिपाली बिऱ्हाडे, अनिता आंबेकर, भारती वैष्णव, प्रितमा महाजन, सुनिता शिंपी, सिमा पाटील, वत्सला सोनवणे, मीना तायडे, कमल सोनवणे, विमल लोणारी, शोभा सपकाळे, यशोदा जयकर, ज्योती कोळी, निर्मला तायडे, वंदना उन्हाळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.