जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी २० वर्षीय तरूणीचा हात पकडून व अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याची घटना नटवर मल्टिप्लेक्स येथे घडली. याप्रकरणी बुधवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील नटवर मल्टिप्लेक्स येथे कामाच्या निमित्ताने बुधवारी ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता आली होती. आय.के.टेलर दुकानातील समीर शेख याने तरूणीचा हात पकडून आणि अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून समीर शेख याच्या विरोधात रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत करीत आहे.