जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २० वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पीडित तरुणी ही घरी असताना गावात राहणारा आदेश आत्माराम नेटके व योगेश आत्माराम नाटके हे दोघं तिच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील वर्तन करून तिच्याशी हज्जत घालत तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच तिचे तिचा विनयभंग करत आमच्या नांदी लागले तर खात्मा करू अशी धमकी देखील दिली. यानंतर तरुणीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी आदेश आत्माराम नेटके आणि योगेश आत्माराम नेटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमृत पवार करीत आहे.