जळगाव प्रतिनिधी । शैक्षणिक संस्था हस्तांतरणाच्या वादात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरुन मेहरुण तलाव परिसरात फिरायला आलेल्या २५ वर्षीय तरुणीला एकाने अडवून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पीडितने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एमबीएचे शिक्षण घेत असलेली तरुणी शनिवारी डी-मार्ट परिसरात मैत्रीणीला भेटण्यासाठी आली होती. तिला भेटून मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेली असता ५.४५ वाजता सिग्नेट स्कूलचे संचालक मनिष रमेश कथुरिया (रा.मेहरुण तलाव परिसर) हा तेथे आला व ‘तू कोर्टात आमच्याविरुध्द साक्ष दिलेली आहे, ती मागे घे’ असे म्हणाला, त्यास साक्ष मागे घेणार नाही असे सांगितले असता कथुरिया याने अश्लित शिवीगाळ करुन अंगलट करुन अश्लिल वर्तन केले. या प्रकारामुळे आरडाओरड केल्याने बांधकामाच्या ठिकाणी असलेले मजूर तेथे आल्याचे पाहून कथुरिया तेथून निघून गेला. या प्रकारानंतर तरुणीने रात्री ११,३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी मनिष कथुरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन पाटील करीत आहे.