यावल प्रतिनिधी । एका तरूणाला धार्मिक तेढ निर्माण होईल अशा शब्दांमध्ये डिवचवून मारहाण केल्या प्रकरणी एका महिलेसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील संभाजी पेठ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक युवक भाजीपाला घेण्यास गेला असता त्यास आकाश सुधाकर हिरवरकर या तरूणाने अडवत स्वत:कडील मोबाईल मधील व्हीडीओ दाखवत तुमच्या धर्मातील पाच जणांना तलवारीसह इतर शस्त्र साठ्या सहित पोलीसांनी पकडले असून त्यांचेकडे तलवारी व बंदुका सापडल्या असल्याचे सांगितले. संबंधीत तरुणाने त्यांना विचारले की तुम्हास आमचेच लोक दिसताता का ? असे उत्तर दिल्यानंतर आकाश हिवरकर याच्यासह सागर हिवरकर, विशाल हिवरकर, गौरव संतोष भोई, वैभव सदाशिव सोनवणे, रोहीत विनोद जाधव व एका महीलेने त्या युवकास तराजुच्या लोखंडी वजनाने डोक्यात मारून बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला दुखापती झाली असून हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांनी घटनेची तात्काळ दखल घेत संंशयीत आरोपीना ताब्यात घेतले. याबाबात एका महीलेसह सात जनाविरूध्द येथील पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७, ३४३, ३३७, १०९, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ सह मु. पोे. का. १३५, प्रमाणे गुन्हा नोंद आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००