जळगाव प्रतिनिधी । सुप्रीम कॉलनी परिसरात सुन्नी इतका मैदानाच्या मागील बाजुस १० मार्च रोजी तरूणाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची गंभीर घटना घडली होती. याप्रकरणी दोन संशयितांना आज शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
शाहरुख सादिक खाटीक वय २५ व मिर्झा शोएब युनीस वय १८ दोन्ही रा आझाद वखारजवळून पिंप्राळा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सुप्रीम कॉलनी परिसरात सुन्नी ईदगाह मैदानाच्या मागील बाजूस एका तरूणाला काही युवकांनी मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत आज शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाल्यावर या गंभीर स्वरुपाच्या प्रकाराबद्दल मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्याकामी त्यांनी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील सहायक फौजदार अतुल वंजारी पोलिस नाईक इम्रान सय्यद पोलिस नाईक मिलिंद सोनवणे पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील पोलिस कॉन्स्टेबल मुकेश पाटील पोलिस कॉन्स्टेबल सुधीर साळवे पोलिस कॉन्स्टेबल सतीश गर्जे व पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर या कर्मचार्यांचे पथक रवाना केले होते. पथकाने केलेल्या चौकशीत व्हिडीअोवरुन मारहाण झालेल्या तरूणाचे नाव दिनेश मगन चव्हाण रा. गोदावरी चक्कीजवळ, श्रद्धा कॉलनी असे निष्पन्न झाले होते. तो या परिसरात एका मुलीला घेऊन फिरत असताना त्याला मारहाण झाल्याचा प्रकार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी व्हिडिओ वरुनच मारहाण करणार्या शाहरुख सादिक खाटीक वय २८ , मिर्झा शोएब युनूस वय १८ ध्वनी राहणार आझाद वखारजवळ पिंप्राळा , जुबेर शेख सलीम रा शिवाजीनगर व एक अल्पवयीन मुलगा या चौघांना निष्पन्न केले हाेते. त्यापैकी शाहरुख खाटीक व मिर्झा युनूस या दोघांना आज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.