जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालय समोरून तरुणाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय कैलास देवरे (वय-२८) रा. पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव हा तरुण २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता त्याची (एमएच १९ डीटी ५८५३) क्रमांकाच्या दुचाकीवरून जळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या विनोद हॉस्पिटल येथे आला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने अवघ्याला १ तासांमध्ये १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय देवरे यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. दुचाकी न मिळाल्याने मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याबाबत विजय देवरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.