तरुणीला एकाच वेळी कोरोना लसीचे सहा डोस !

 

 

 

रोम { इटली ) : वृत्तसंस्था । तरुणीला एकाच वेळी फायझर बायोन बायोटेक लसीचे सहा डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

लसीचे सहा डोस देण्यात आल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ सुरु झाली होती. लसीचे सहा डोस देण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर २३ वर्षीय तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तरुणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. यानंतर तरुणीला डिस्चार्ज देण्यात आला. इटलीमध्ये ही घटना घडली आहे.

 

रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तरुणीला लसीचे डोस देण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून लसीची संपूर्ण बाटली मोकळी करत तरुणीला डोस दिले. या बाटलीत एकूण लसीचे सहा डोस होते. आरोग्य कर्मचाऱ्याला सहा सिरिंज मोकळ्या दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

 

यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं. तरुणीला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.  तरुणीला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 

तरुणीला सहा डोस देण्यात आल्याने तिच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर डॉक्टर लक्ष ठेवून असतील अशी माहिती प्रवक्त्याने दिली आहे. ही तरुणी रुग्णालयातील मानसोपचार विभागात इंटर्न म्हणून काम करते. याप्रकरणी चौकशी आदेश देण्यात आले असून प्रवक्त्यांनी ही मानवी चूक असून जाणुनबुजून करण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे.

Protected Content