यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी I तालुक्यातील न्हावी येथून तरूणाला तीन तलवारींसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास तालुक्यातील न्हावी गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची ही कारवाई दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ जवळील यावल तालुक्यातील अकलूद या गावा जवळील एका हॉटेल जवळून गावठी कट्टा हस्तगत करण्यात यश मिळाले होते. त्यानंतर न्हावी गावातुन एका तरुणाकडे या तलवारी मिळून आल्याची कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे . न्हावी गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचा तरूण हा तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हेकॉ महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा शोध घेतल्यावर नंतर तो मिळवून आल्यावर त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर व कॉन्स्टेबल राजेश बराटे हे करीत आहे.