तरुणाने वाढदिवसानिमित्ताने केले मातोश्री वृद्धाश्रमात आध्यात्मिक पुस्तकाचे वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । वाढदिवस आला म्हणजे तरुणाई मित्र मैत्रिणिंसोबत केक, पार्टी आदींचे आयोजन वाढदिवस साजरा करत असते. परंतु, एका तरुणाने आपला वाढदिवस केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे आध्यात्मिक पुस्तकाचे वाटप व रक्तदन करून आगळया वेगळया पद्धतीने साजरा केला.

सागर दिलीप कुटुंबळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे आध्यात्मिक पुस्तकाचे वाटप केले. तेथील आजी-आजोबांसोबत आपला सहवास घडवून आनंदी आनंद निर्माण केला. यावेळी सागर कुटुंबळे व त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान केले.  त्यांच्या सोबत उपस्थित रोशन पाटील, वेदांत नाईक, रोहित कुटुंबळे, अतुल पाटील उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होताना आपणास दिसून येते. या उपक्रमातुन सागर कुटुंबळे या तरुणाने एक आदर्श समस्त तरुणाईपुढे निर्माण केला आहे.

Protected Content