Home क्राईम तरवाडे येथील दवाखान्यात हजारोंची चोरी

तरवाडे येथील दवाखान्यात हजारोंची चोरी

0
38

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील तरवाडे येथील एका खासगी दवाखान्यातून ५० हजार रुपये रोकडसह ६० हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पवारवाडी येथील डॉ. केतन गोरख वाघ (वय-३५) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. वाघ यांचा तरवाडे गावातील साईबाबा मंदिराजवळ ध्वनंतरी क्लिनिक दवाखाना आहे. मात्र या दवाखान्याच्या दरवाजाचे कडीकोंडा तोडून अज्ञाताने मधील ८ हजार रुपये किं.चे लिनोव्ह कंपनीचे लॅपटॉप, २ हजारांचा मॅक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल व ५० हजार रुपये रोख असे एकूण ६० हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची थरारक घटना ३१ जानेवारी रात्री ८:३० वाजेपासून तर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाघ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास जयवंत सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound