यावल, प्रतिनिधी | येथील आदिवासी समाजातील जेष्ठ समाजसेवक तथा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच प्रदेश अध्यक्ष सेवानिवृत मुख्याध्यापक एम .बी . तडवी व त्यांच्या पत्नी जुबेदा मुजाद तडवी यांची नियोजन आढावा समितीच्या अशासकीय जिल्हा सदस्यपदी निवड झाल्याने युवक राष्ट्रवादीतर्फे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य यांची आदिवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरिय ( नियोजन आढावा समितीच्या अशासकीय जिल्हा सदस्यपदी सेवानिवृत मुख्याध्यापक एम .बी . तडवी व त्यांच्या पत्नी जुबेदा मुजाद तडवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील , युवक राष्ट्रवादीचे तालुका समन्वयक गोलु माळी, युवक राष्ट्रवादीचे यावल शहर कार्यध्यक्ष नरेंद्र शिंदे , ललीत नेमाडे यांनी तडवी दाम्पत्यांचे स्वागत सत्कार केले. यावेळी एक अभ्यासू व्यक्ती म्हणुन ओळख असलेल्या तडवी सरांकडुन सर्वसामान्य गोरगरीब आदिवासींच्या कल्याणकारी योजना या सर्वोतोपरीने शेवटच्या आदिवासी कुटुंबा व घटकापर्यंत पहोचवण्यात त्यांनी पर्यंत करतील व त्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा व विश्वास यावेळी सत्कार प्रसंगी अॅड. देवकांत पाटील यांनी व्यक्त केली .