पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून तरुणाला लोखंडी रॉड व चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ मे रोजी रात्री १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वसंत गुजर (वय-२३, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे अक्षय गुजरच्या घराच्या बाजूला सार्वजनिक रोडवर अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी अक्षयची आई वंदना वसंत गुजर यांनी शेंदुर्णी नगरपंचायत येथे तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून अतिक्रमण असलेल ठिकाणी दरवाजा नगरपंचायत विभागाकडून काढण्यात आला. याचा राग आल्याने दर्शन राजू गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामू विठ्ठल गुजर, राजीव दिला गुजर आणि सचिन अनिल धनगर सर्व रा. शेंदुर्णी या पाच जणांनी महिलेच्या मुलगा अक्षय वसंत गुजर याला चाकू व रॉडने वार करून पाठीवर व हातांवर गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जणांना पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.