ढाब्यावर चाकू दाखवून ७ हजार रुपये लुटले ; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील नॅशनल हायवे नंबर सहा जवळ पंजाब खालसा ढाबा येथे तीन इसमांनी चाकूचा धाक दाखवून ढाब्यामधील सामानाची तोडफोड करून गल्ल्यातून रोख ७ हजार रुपये चोरून नेल्याने बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील नॅशनल हायवे नंबर सहा जवळ पंजाब खालसा ढाबा येथे तीन इसमांनी चाकू दाखवून फिर्यादीस तू माझ्याविरुद्ध मागे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तो वापस घे असा दम भरला. तसेच फिर्यादी सारंगधर पाटील (वय 48 रा. गुंजाळ कॉलनी, खडका रोड भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आशिख बेग अस्लम बेग मिर्झा उर्फ बाबा काल्या, समीर (पूर्ण नाव माहीत नाही. रा. खडका रोड अन्सारउल्ला मस्जिद समोर भुसावळ) ,नाईम (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याच्या सोबत इतर तीन लोकांनी दिनांक १८ जानेवारी २०२१ रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ढाब्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून ढाब्यामधील सामानाची तोडफोड केली. तसेच काउंटर टेबलच्या गल्ल्यातून रोख रक्कम ७,००० रुपये चोरून नेले म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग -५ गुरुन २४/ २०२१ भादवी कलम ३९४, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत ,मंगेश गोठला यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/835147627045491

 

Protected Content