मुंबई प्रतिनिधी । येथील ख्यातनाम नाईट क्लब ड्रॅगन फ्लायवर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी छापा टाकण्यात आला असून यात क्रिकेटपटू सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. तर, रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
करोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे”.