जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात ४ ठिकाणी होणारे ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम असल्याची माहिती आज जिल्हा शल्य चिकित्सक एन . एस . चव्हाण यांनी दिली .
जिल्हा शल्य चिकित्सक एन . एस . चव्हाण पुढे म्हणाले की , राज्य सरकारकडून आपल्या जिल्ह्यात येत्या १० दिवसात कोरोना लस उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष लसीकरणात अडचणी येऊ नये म्हणून आधी ही सरावाची तालीम केली जाते आहे काय अडचणी येऊ शकतात आणि त्यावर काय उपाय करावे लागतील याची पूर्वकल्पना या सरावाच्या तालमीतून येईल या सरावातून माहिती गोळा करून प्रत्यक्ष अंमलबजावणीत सुधारणा केल्या जातील यासाठी २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे या सगळ्यांची नोंदणी संगणकावर केली आहे लसीकरणाच्या एका केंद्रावर ३ कक्ष असतील त्यात पहिली वेटिंग रूम , दुसरे लसीकरण कक्ष आणि तिसरे निरीक्षण कक्ष असेल . तिसऱ्या कक्षात लस घेणाऱ्या प्रत्येकाला लस दिल्यावर निरीक्षणासाठी अर्धा तास थांबवले जाईल तेथे नोंदणीसाठी १ , लसीकरणासाठी २ आणि निरीक्षणासाठी २ असे ५ कर्मचारी नेमले जातील निवडणुकीचे मतदान आणि निकालापर्यंत जशी प्रत्यक्ष प्रशासकीय यंत्रणा मोहिमेच्या तंत्राप्रमाणे राबविली जाते तसे या लसीकरण अंमलबजावणीसाठी यंत्रणा राबवली जाणार आहे , असेही ते म्हणाले .
( https://fb.watch/2St719HYNi/ )