हैदराबाद । डोनॉल्ड ट्रंप हे कितीही वादग्रस्त असले तरी त्यांचे फॅन्स जगभर असून अशाच एका भारतीय फॅनची ट्रंपभक्ती आता सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव विश्वात लोकप्रिय आहे. भारतात देखील त्यांच्या फॅन्सची कमी नाही. असाच एक त्यांचा चाहता सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. तेलंगाणामधील जनगावात बूसा कृष्णा राहतात. ते डोनाल्ड ट्रम्प यांचे जबरा फॅन आहेत. इतकेच नाही तर रोज त्यांची पूजा करतात. आता बुसा कृष्णा यांनी ट्रम्प यांची भेट व्हावी, अशी विनंती भारत सरकारला केली आहे. ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौर्यावर येत आहेत. यावेळी ट्रम्प यांची भेट व्हावी, अशी विनंती बुसा यांनी भारत सरकारकडे केली आहे. बुसा कृष्णा डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप मोठे प्रशंसक आहेत. त्यांनी गेल्या वर्षी आपल्या घराबाहेर ट्रम्प यांची सहा फूट उंचीचा पुतळा उभारला आहे आणि ते या पुतळ्याची पूजा देखील करतात. बुसा यांनी भारत सरकारकडे विनंती केली आहे की, मला डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायचे आहे आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने मला मदत करावी.
इतकेच नाही बुसा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिर्घायुष्यासाठी बुसा शुक्रवारी उपवास करतात. बुसा म्हणतात की, भारत आणि अमेरिकाचे संबंध असेच दृढ राहावेत. त्याचबरोबर, बुसा आपल्यासोबत ट्रम्प यांचा एक फोटो आपल्याजवळ ठेवतात. बुसाचे मित्र रमेश रेड्डी म्हणतात की, ट्रम्प यांचा फॅन असल्याने बुसाला त्याच्या गावामध्ये ट्रम्प नावाने ओळखले जाते. गावकरी त्याच्या घराला मट्रम्प हाऊसफ म्हणतात. रेड्डी यांच्या माहितीनुसार गावातील लोक बुसाचे खूप सन्मान करतात. आणि ट्रम्प यांच्या पूजेला कुणी कधीही विरोध केला नाही. २४ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौर्यावर येत आहेत. याआधी ट्रंप यांच्या चाहत्याचे हे प्रेम चर्चेचा विषय बनले आहे.