पाचोरा, प्रतिनिधी ! डोगरगांवचे माजी सरपंच पंढरीनाथ मागो पाटील यांचे उपचारादरम्यान आज रुग्णालयात निधन झाले.
डोंगरगावांतील सरपंच म्हणून अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच गरिबांचा समाजसेवक अशी पंढरीनाथ पाटील यांची ख्याती होती . आज दुपारी ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. पंढरीनाथ पाटील डोंगरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे सदस्य होते. रुग्णसेवक म्हणून रुग्णांना उपचारासह स्वतः घरून जेवणाचा डब्बा पुरविणे , लग्न कार्यात गरजूंना आर्थिक सहकार्य करण्याचे काम त्यांनी स्वतः रुग्णालयात दाखल होईस्तोवर केले अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, जावई, नात असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार गणेश शिंदे यांचे मेहुणे होते. त्यांच्या निधनाने डोंगरगावावर शोककळा पसरली आहे.