यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथे दर शनिवारी आठवडा बाजार असतो. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शासनाचे नियम धाब्यावर ठेवून आज आठवडा बाजारात नागरिकांनी गोंधळ निर्माण करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. ग्रामपंचायतीने कुचकामी दिसून येत आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाने कहर केला असून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान जनता कर्फ्यू पाळणे या संदर्भात ग्रामपंचायततर्फे सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान कोणालाही गावाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आठवडे बाजार भरण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार करावा असे सुचित करण्यात आले होते. मात्र गेल्या गेल्या महिन्यात प्रत्येक शनिवारी आठवडा बाजार भरतो मात्र सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळला जात नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान शनिवार १६ मे रोजी आठवडा बाजार भरणार नाही अश्या सुचना ग्रामपंचायतीने दिले असतांना सरपंचा यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून शासनाने नियम ढाब्यावर ठेवून बाजार भरविला. बाजारात एकाही विक्रेते आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतांना दिसून आले नाही. दरम्यान जळच्या हिंगोणा गावात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याने इतर गावातील नागरिकांनी खबरदारी म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात गावातील अरूणोदय विद्यालयात दोन पुरूषांसाठी, महिलांसाठी एक असे तीन विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येवून कक्षात दाखल असलेल्या एकाच कुटूंबातील पाच व्यक्तींना मोफत गहू व तांदूळ देण्यात आलेत.