शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या कुर्हाड खुर्द गावातील गरजू कुटुंबांना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. सागर गरूड यांच्यातर्फे अत्यावश्यक वस्तूंचा समावेश असणारे किट वाटप करण्यात आले.
आषाढ़ी एकादशीचे औचित्य साधुन सोशल डिस्टिंगचे पालन करत पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड़ यांचेतर्फे गरजू परिवारांना ५०० किराणा किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये त्यात गहू,साखर,चटणी,हळद,तेल,मीठ,बेसनपीठ,साबण आदी वस्तूंचा समावेश होता.
यावेळी डॉ.सागर गरुड मित्र परिवारातील सुधीर पाटील,महेंद्र पाटील,अतुल जगदाळे,उल्हास शेजुळ,आरिफ़ काकर,चरणदास दूधे,प्रताप भिल्ल आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच महादेव मंदिर समोरील जाधव (वडार) वस्तीत एक महिला कोरनाबाधित आढळुन आली होती. गरिबांची वस्ती असलेला परिसर आहे. कोरानामुळे हा परिसर सिल केला असून या भागातील सर्व परिवार क्वारंटाईन केलेलें असल्याने,या वस्तितील काही गरजू परिवारांना दररोजची उपजीविका भागविणे अवघड जात होते. या पार्श्वभूमिवर डॉ. सागर गरूड यांच्यातर्फे संबंधीत कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
निलेश पाटिल,शुभम पाटिल,महेंद्र माळी,गणेश देशमुख,ललित जैन,विशाल पाटील व सागर जगदाळे यांनी पुढाकार घेऊन ही माहिती डॉ.सागर गरुड याना दिली. यामुळे त्यांनी संपूर्ण गांवात किराणा किट वाटप केल्याने मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे.