डॉ. सतिष पाटील यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध: बाजार समितीचा निकाल कायम

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी डॉ. सतीश पाटील यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जावर आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यात बाजार समितीचा निकाल कायम ठेवत जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांनी माजी मंत्री डॉ. सतिश पाटील आणि रेखा सतिष पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग या दोन गटांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेतला होता. तर डॉ. सतीश पाटील यांनी अमोल चिमणराव पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या दोन्ही प्रकरणांवर गुरूवारी १३ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यात सुनावणी अंती जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अवैधचा निर्णय कायम ठेवत माजी मंत्री डॉ. सतिष पाटील व रेखा सतिष पाटील याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला आहे.

या सुनावणीत डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर अमोल पाटील यांच्या विरूध्दचा आक्षेप फेटाळण्यात आला. या प्रकरणी दबावतंत्राचा वापर करून आपल्या विरूध्द निकाल देण्यात आल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. तर, अमोल पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत निकालातून सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. दुसरीकडे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपिल केली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आजच्या निकालात जिल्ह्यातील माजी मंत्र्याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. आता उच्च न्यायालय माजी मंत्री सतिश पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात कार्य निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content