डॉ. संतोष पाटील यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार

 

 

पाचोरा,  प्रतिनिधी !  गोराडखेडा ( ता. पाचोरा )  येथील डॉ. संतोष पाटील यांना ग्रीन फाउंडेशन  यांच्यातर्फे आदर्श समाजरत्न   पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

संतोष पाटील हे गोराडखेडा  येथील रहिवासी असून ते व्याख्याते व लेखक  आणि  न्यू हायस्कूल, भोकरदन येथे शिक्षक आहेत. संतोष पाटील हे विभिन्न  कार्य करतात. देशभरात ते व्यसनमुक्ती व तरुणांना प्रेरणादायी व्याख्याने देत असतात.  दुर्गम भागात व वाड्यावस्त्यांवर जाऊन ते  महामानवांचे विचार पोहोचवतात. व्याख्यानाचे मानधन आयोजकांनी सांगितलेल्या  अनाथालय , वृध्दाश्रम किंवा समाजोपयोगी कार्यासाठी ते खर्च करत असतात. याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना न्यू ग्रीन फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार व ट्रॉफी प्रदान करण्यात आली . यामुळे त्यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन  होत आहे

Protected Content