जळगाव प्रतिनिधी । आज प्रत्येकाच जीवन धावपळीच झाल आहे. शरीरही संपत्ती असं आपण म्हणतो मात्र आपल्या शरीराकडे, निरोगी राहण्यासाठी लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी किमान रोज ५ मिनिटांचा वेळ काढावा, असे सांगून महिलांचे आजार तसेच त्यावर घेण्याची काळजीबाबत तसेच निरोगी राहण्याच्या टीप्स डॉ. शरयु विसपुते यांनी दिल्या.
निमजाई फाऊंडेशनतर्फे जुना नशिराबाद रोडवरील प्रशिक्षण केंद्रात बुधवारी जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात झाला. या दिनानिमित्ताने फाऊंडेशनच्या फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. शरयु विसपुते या बोलत होत्या. यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका अर्चना पाटील, सुवर्णा पाटील, रुपाली पाटील, नितु चौधरी, जनसंपर्क अधिकारी किशोर पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. विसपुते यांच्या हस्ते सरस्वतीला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
किशोर पाटील यांनी डॉ. विसपुते यांचा परिचय करून दिला. शिक्षिका अर्चना पाटील यांनी डॉक्टर विसपुते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक फाउंडेशनचे समन्वयक महेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन किशोर पाटील तर आभार समन्वयक विवेक जावळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनींची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी रुपम जावळे, कुणाल कोलते यांनी परिश्रम घेतले.
व्यायामांबरोबरच योगाचे फायदेही
यावेळी डॉ.शरयू विसपुते यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात विद्यार्थिनींशी संवाद साधत मार्गदर्शन केले. डॉ. शरयू विसपुते यांनी मार्गदर्शन करताना मुली व महिला यांच्यात वयोमानानुसार होणारे हार्मोन्सचे बदल, पाळीचे विकार’ यामुळे उद्भवणाऱ्या समस्या व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. तसेच निरोगी राहण्यासाठी पोहणे, चालणे सायकलिंग यासारख्या व्यायामांबरोबरच विविध योग प्रकार व त्याचे फायदेही पटवुन दिले. योगामधील दीर्घश्वसन व ओंकार हे पाच मिनिटांचे सेशनही त्यांनी विद्यार्थिनींकडून करून घेतले.
निरोगी राहण्याचा केला संकल्प
शरीर ही आपली संपत्ती आहे असा आपण म्हणतो मात्र शरीरासाठी वेळ काढत नसल्याने विकार जडतात असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार “शरीर ही दैवी संपत्ती आहे. त्याचे मी जाणीवपुर्वक काळजी घेईल. मी माझ्या शरीरासाठी मी रोज ५ मिनिटांचा वेळ काढेन व निरोगी राहण्यासाठी कष्ट घेईन” असा” संकल्पही डॉ. विसपुते यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींकडून करून घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली .