जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील डॉ.अण्णा साहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात” रिसर्च इन बायो, जिओ, केमिकल सायन्सेस : ए ग्लोबल सिनारिओ” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार 25 मार्च 2023 रोजी करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल प्राणिशास्त्र, IQAC आणि क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ यांच्यावतीने संयुक्तरीत्या करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता विद्यापीठचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी लेवा एज्युकेशनल युनियनचे संचालक श्री. किरण बेंडाळे हे उपस्थित राहतील. या परिषदेत क.ब.चौ. उ. म. विद्यापीठाच्या पेस्टिसाइड व ऍग्रो केमिकल्स विभागाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ. रत्नमाला बेंद्रे यांचे ‘ Insect Growth Regulators ( IGRS) as substitute to pesticides’ या विषयावर बीज भाषण होणार आहे.
पुणे येथील Zoological Survey of India येथील शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलवटे यांचे ” Role of DNA barcoding in solving the cryptic species complex” या विषयावर तर वल्लभ विद्यानगर (गुजरात) येथील एन. व्ही. पटेल कॉलेज येथील बायोलॉजिकल सायन्सच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रिटा निर्मलकुमार यांचे ” Recent advances in science- nanotechnology “, तसेच प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांचे ” A study of place names related to Botany, Zoology, Chemistry, Geography & Environmental and Earth Sciences “या विषयावर आमंत्रित व्याख्याने या परिषदेत होणार आहेत. या परिषदेसाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक ,संशोधक विद्यार्थी यांनी नोंदणी केली आहे.