भुसावळ, प्रतिनिधी । येथील डॉ. नितु पाटील यांनी प्रशासनास मद्याची दुकाने उघडण्याच्या निर्णयांवरून अनाहूत पत्र लिहले आहे. या पात्रात त्यांनी प्रशासनाने निर्णय मागे घ्यावा किंवा घरपोच दारू पोहचवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
डॉ. नितु पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना खुले पत्र, त्यांच्याच शब्दात : मागील 45 दिवसापासून जळगाव प्रशासनाने करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेलं उपाय आणि परिणाम आपण आज पाहतच आहोत. रेड झोनमधील जळगाव जिल्ह्यात दारू, बिअर विक्रीची सुरवात करण्याबाबत आपला निर्णय आजच वाचला त्यावर मत …!
दुकान उडण्याच्या खरे म्हणजे प्रशासनाला विनंती आहे एक तर निर्णय मागे घ्या किंवा घरपोच दारु पोहचवू अशी परवानगी तरी द्या. तसेच दुप्पट, तिप्पट भावाने विकण्याची मुभा द्या. तसेच दुकान काम करण्याची सहकारी वर्गासाठी आणि मालक या सर्वसाठी पीपीई किट, मास्क, आरोग्य विमा कवच, पोलीस प्रोटेक्शन आदी याची त्वरित पूर्तता करा. कारण सर्वांना परिवार आहे, तेव्हा देश चालवण्यास हातभार लागत असेल तर नक्की सरकारने वरील बाबीची पूर्तता करवी आणि मग 24 तास दुकाने उघडी ठेवण्याची घोषणा करावी..! आणि सरकारला जर महसुल महत्वाचा असेल तर मी मागे 10 कलमी कार्यक्रम सुचवला होता, तो मी फेकबुक वर शोधत आहे, वेळ असल्यास तुम्हीही शोधा…! हे सगळं नियोजित वाटतंय,… कारण सरकारने सांगितलं पण जळगाव जिल्हाधिकारी यांनी १७ मे पर्यंत कुठलीच दुकाने उघडणार नाही असे आदेश काढले होते… पण आज अस अचानक काय झालं, की जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला ? खरंतर लोकडाऊन मध्ये मोठ्याप्रमाणावर दारूची अवैध विक्री (ब्लॅक) झाली, आता आधी प्रत्येक वाइन शॉप मधील तपासणी केली असती तर ती आकडेवारी देखील समोर आली असती. पण ती आकडेवारी समोर येऊ नये… व महिनाभरात विक्री केलेल्या मालाची तफावत विक्री सुरू झाल्यावर भरून काढावी, म्हणजे कुणालाच कळणार नाही, अशी ही सर्व व्यवस्था आहे… त्यात जळगाव जिल्ह्यातील वाइन शॉप बिअर बार कुणाचे आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही….
१.महाराष्ट्र राज्याला महसुल महत्वाचे आहे, ही बाब यामुळे नक्कीच अधोरेखित झाली,त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्या, आणि महाराष्ट्रच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावावा.आपल्या जीवाची, परिवाराची, इतर नागरिकाची काळजी करायची नाही.मला एक कळत नाही सर्वांत जास्त महसूल यामुळेच येतो तर मग दारु बंदी खात हवं कशाला…?
२.आपण फक्त दुकाने चालू केलीत,बार, रेस्टॉरंट आदी बंद, म्हणजे तुम्ही बाटली घ्या आणि कुठेही प्या, नाहीतर घरीच आपल्या बायको मुलांसमोर प्या, आता जर तो बाहेर कुठे पिउन घरी येतांना शिस्तीत अथवा लेझीम खेळत येईल अथवा कुठे रस्त्याचा कडेला समाधी लावेल, या बद्दल काही माहिती स्पष्ट नाही, सोशल अंतर,सामाजिक अंतर हयाचे पालन कसं होणार..?
३.भाजीपाला मार्केट मध्ये प्रशासन, समाजसेवक, लोकप्रतिनिधी आदी ओरडुन ओरडून सांगतात, सामाजिक अंतर बद्दल ते नागरीक मानसिक स्थिती उत्तम असतांना देखील ऐकत नाहीत,आता दारूच्या दुकानासमोर कोणी प्यायला बसल्यावर जर त्याचा मुक्त संचार करण्याची सुबुद्धी झाली तर काही उपाय योजना..?
४.आमच्या भुसावल मध्ये 4 झोन निर्माण केले आहेत,तिथे नगरपालिका आणि पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे, आता जर दुकाने सुरू झाली तर अजून जास्त प्रमाणात पोलीस लागतील,आधीच संख्या कमी आणि आता हे तळीराम, दंडके मारून उपयोग होणार नाही,तेच त्यांच्या भाषेत पोलिसांची शोभा काढतील, तेव्हया काय?
५.तुमच्या आदेशानुसार क्रमांक 2,अनव्ये जेष्ठ नागरिक,आजारी व्यक्ती यांनी घर थांबावे, कारण यांना संसर्ग लवकर होतो,मग आता दारू पिल्यावर ते आता काय शक्तिमानच होणार आहे, कशाचा करोना,,, फिरोना,फ़क्त दारू धोसोना..!
६ शेवटचा मुद्दा2 कालच नाशिक मा.जिल्ह्याधिकारी यांनी दारू विक्रीसाठी परवानगी दिली, आणि गर्दी एवढी की दुकानांवर दारुमेळावा भरला, पोलीस हतबल, सोशल अंतरीची ऐसी तैसी, काही ठिकाणी वादविवाद,काहीही नियोजन नाही, आणि त्यांनी आजचा नवीन आदेश काढून दारू विक्री ला बंदी घातली,
तेव्हा जळगाव जिल्हात त्यापेक्षा फार वेगळे चित्र राहील असे मला वाटत नाही, तेव्हा तुम्हाला पण असा निर्णय घ्यावा लागेल,यात माझ्या मनात शंका नाही.
आणि जर सर्व नियम, सोशल अंतर, अगदी व्यवस्थित पाळले गेले तर जळगाव जिल्हा महसूल देण्यासाठी नंबर 1 येण्यासाठी इमाने इतबारे प्रामाणिक प्रयत्न करेल, ही शक्यता नाकारता येणार नाही…!
(मला एक शंका वाटते, दारू विक्री सुरू करायची, नागरिकांनी 3,6 महिन्याच्या कोठा विकत घ्यावा, म्हणजे महसुलचा मागचा आणि पुढचा बॅक लॉग पूर्ण भरून निघेल आणि मग परत तळीरामांवर खापर फोडून दारू विक्री बंद)
निर्णय आज झाला आहे आता जनता कशी प्रतिसाद देते हे पाहण्याचे औसूक्त्याचे ठरेल…!
जय श्री राम!