डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांचा कलांचा आविष्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बॉलीवुडपासून ते हॉलिवुडमधील सर्वच दर्जेदार कलाकारांच्या छबी आणि महाराष्ट्राला लाभलेली संताची परंपरा ही वारकर्‍यांच्या वेशभुषा व विठ्ठल विठ्ठल या गीताद्वारे दिसून आली डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात. निमित्‍त होते वार्षिक स्नेहसंमेलनाचे.. स्नेहसंमेलनाच्या तिसर्‍या दिवशी अर्थात बुधवार १२ एप्रिल रोजी डॉ.केतकी हॉल येथे सकाळी कॉसप्लेचे आयोजन केले होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनीे धर्मेंद्र, अमिताब बच्चन, गंगुबाई, मुन्नाभाई-सर्किट, हॅरी पॉटर, ठाकूर, चार्ली चाप्लीन, मार्शमेलो यासारख्या विविध कलाकारांचे प्रसिद्ध डायलॉग तसेच त्यांची नृत्यकलेचा आविष्कार सादर केला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड ह्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर हे होते. आयोजन समितीच्या सदस्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये विक्रांत गायकवाडने हॅरी पॉटर, प्रांशु भालाने धर्मेंद, कोमलने मिस चांदनी, प्रणव वावगेने अमिताभ बच्चन, रश्मी खडसेने गंगुबाई, सेजल ठाकरे हिने श्रीदेवी, सुधाने जब वी मेट मधील गीत, वैष्णवी डाबेराव हिने शनया, सानिका व रमाकांत यांनी सर्किट व मुन्नाभाई, व्यास हिवरेने ठाकूर, आर्या नाईकने मार्शमेलो, बुशरा खानने वेडन्सडे अदाम्स, दिव्या धांडे हिने नैना, कल्याणी साबळेने दयाबेन, मेघाने कामली, खुशी सुराणा हिने देवदासमधील पारो, ओमप्रकाश मुटकुले याने जयकांत शिर्के, प्रसाद कोठावदेने डेनवेअर, साक्षी ठाकरे हिने अलीझेन, विशाल नरवाडे वॉव्हेरीन, श्रृती ताडसने मिस चांदनी, अभिषेक संकुरेसह गृपने वारकरी परंपरा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कापसे, गणेश मुसळे यांनी केले. कार्यक्रमासाठी युक्‍ता बियाणी, सुदिक्षा धरणे यांच्यासह टिमचे सहकार्य लाभले.

नाविण्यपूर्ण उपक्रमाची निर्मिती
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासात इतका दर्जेदार असा कॉसप्लेचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला, त्याबद्दल आयोजन समितीचे अभिनंदन करतो. नाविण्यपूर्ण अशा उपक्रमाची येथे निर्मिती झाली, येथील प्रत्येकी विद्यार्थी भविष्यातील स्टार आहे, असे सांगून डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा व भजनांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सिनेसृष्टीतील कलावंताच्या भुमिका हुबेहुब सादर करण्याचा प्रयत्न केला असून तो खुप स्तुत्य आहे.

Protected Content