डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा आयोजित रॅलीत सहभाग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय शाखेच्या महाविद्यालय व रुग्णालयातर्फे शुक्रवार  ७ एप्रिल रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

 

शहरातील भाऊंच्या उद्यानापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी रॅलीचे मुख्य समन्वयक डॉ.राजेश कोलारकर यांनी सांगितले की, योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार, योग्य दिनचर्या हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. तसेच अवयव दानाचे महत्त्व, आरोग्य योग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कसे महत्त्वाचे आहे हे प्राध्यापक डॉ. दिलीप ढेकळे यांनी सविस्तर सांगितले. डॉ.माडावी. डॉ.अब्दुल कुदुस, डॉ.अविनाश महाजन, डॉ.अपर्णा यांनीही आरोग्य विषयी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन डॉ. नरवडे यांनी केले. यावेळी वी.काबरा, विजय मोरे, डॉ. शोएब, डॉ. धाकाते, डॉ. काटे, डॉ. पानसरे, डॉ. साखळीकर, डॉ. राहुल बाविस्कर यांच्यासह जळगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. आजच्या दिवशी अवयव दान महाअभियान प्रभावीपणे सुरू करण्यात आले.

 

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मोबाईल कडून मैदानाकडे आणि मैदानाकडून मनशांतीकडे या उपक्रमाची सुरुवात रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कोलारकर यांनी जाहीर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्राचार्य प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Protected Content