डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात रक्षाबंधन सण उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भाऊ-बहिणीच्या नात्याला रेशमी दोर्‍याने बांधणारा रक्षाबंधन सण आज डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेले व रुग्णसेवेची शपथ घेऊन निवासी डॉक्टर्स होवून २४ तास सेवा देणारे, घरापासून दूर असलेल्या भावांना आज रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने कुंकवाचा टिळा लावित राखी बांधली आणि आनंदाच्या वातावरणात सण साजरा करण्यात आला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात केवळ उपचारच नव्हे तर रुग्णांना मायेचा ओलावाही दिला जातो. त्याचा अनुभव आज रुग्णालयात दाखल असलेल्या शेकडो रुग्णांना आला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयातील मेडिसीन, ऑर्थो, इएनटी, ओबीजीवाय, सर्जरी अशा प्रत्येक विभागातील ब्रदर्स, डॉक्टर्स, रुग्ण, सिक्युरिटी कर्मचार्‍यांना सिस्टर, नर्सेसद्वारे कुंकवाचा टिळा  लावून राखी बांधण्यात आली असून निरोगी दिर्घायुष्याच्यासाठी शुभेच्छा दिल्यात.  या उपक्रमामुळे रुग्णांना बहिणीची कमरतात भासली नसून चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. भाऊराया काळजी करु नकोस, लवकरच तू बरा होवून घरी जाशील असे सांगत बहिणींनी दिलासा दिला आणि पेढाही भरविला. उपचारासाठी येथे आलो आणि तुमच्या रुपात मला नविन बहिण मिळाल्याचे रुग्णांनी सांगितले. या उपक्रमासाठी नर्सिंग विभागाचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content