डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वढोदा प्र. शा. तालुका यावल येथे निवासी सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन पार पडले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून वढोदा प्र. शा. गावातील उपसरपंच सुनिल बोदडे, अंगणवाडी सेविका ज्योती प्रकाश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा.एन. डी. पाटील यांनी सात दिवसीय कामाची रुपरेषा सांगितली. गावातील उपसरपंच व प्राचार्य यांनी उत्साहात शिबीरासाठी आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कविता पवार हिने तर आभार वैष्णवी पवार हिने मानले. यावेळी सहायक प्राध्यापिका सोनिया इंगोले, मधुकर पांगळे व सर्व स्वयंसेवक व ग्रामसेवक उपस्थित होते.

Protected Content