डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पावसाच्या सरींसोबत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

 

सोमवार, १५ ऑगस्ट या स्वतंत्रताच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी ध्वजारोहण केले. शिक्षक विद्यार्थी तसेच पालक यांनी देखील ध्वजाला वंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य व गायनाद्वारे आपले देशभक्ती तसेच देश प्रेमाचे प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाद्वारे स्वतंत्र्य चळवळीचा इतिहास भारताची सद्यस्थिती व येणार्‍या भारताचे सुंदर चित्र रेखाटले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content