जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात आज संवाद चित्रकारांशी हा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील खान्देश कलारत्न प्राप्त चित्रकार तरुण भाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इ चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध प्रश्न विचारलेत.आपले आवडते चित्रकार कोण,?चित्रकलेचे फायदे काय आहेत?चित्रांचे प्रकार कोणते?चित्र काढण्याची सोपी पद्धत कोणती? या सारखे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले,तरुण भाटे यांनी ही सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे सोप्या शब्दात दिली.विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, सोपे चित्र कसे काढता येईल हे समजण्यासाठी, चित्रकलेतील विविध प्रकारची माहिती मिळावी,रंगाचे माध्यम समजावे हा या उपक्रमाचा हेतू होता. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. या प्रसंगी शिक्षक व चित्रकला शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम दहीभाते तर आभार कविता पाटील यांनी मानले.