जळगाव, प्रतिनिधी । शहरातील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त शाळूमातीपासून पर्यावरण पूर्वक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच ऑनलाइनच्या माध्यमातून घेण्यात आली. यात १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऑनलाइन कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच गणपती बाप्पाची पर्यावरण पूर्वक गणेश मूर्ती तयार केली. मूर्ती तयार करतांना मातीत पाण्याचे प्रमाण किती असावे,मातीचे गोळे तयार करून त्यापासून मूर्तीचे भाग कसे तयार करावे, रंगाचा वापर किती व कशा प्रमाणात करावा या सर्व गोष्टीची माहिती या वेळी देण्यात आली.
पर्यावरण संवर्धन व पाण्याचे प्रदूषण होऊ न देणे हा या कार्यशाळेमागचा हेतू होता. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा घेण्यात आली. कलाशिक्षक देवेंद्र कोल्हे यांनी सविस्तर माहिती सांगितली. शाळू मातीच्या गणपतीचे फायदे यावेळी त्यांनी सांगितले.
पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचे शाळेने ठरवले असून, पर्यावरण वाचवण्याचे आवाहन केले आहे. ज्या कोणाला शाळू माती पासून गणपती बनवण्याची माहिती किंवा व्हिडिओ पाहिजे असल्यास 9595406528, 9923114814, 9420499986 या मोबाईल क्रमांकांवर वर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1025734744549500/