Home Cities जळगाव डॉ. आचार्य विद्यालयात ऑनलाईन रक्षाबंधन

डॉ. आचार्य विद्यालयात ऑनलाईन रक्षाबंधन


जळगाव (प्रतिनिधी) विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात ऑनलाईन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

 

यावेळी रक्षाबंधननिमित्त व्हिडीओच्या माध्यमातून राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. भावा-बहिणीच्या प्रेमाची महती ही श्रीकृष्ण द्रोपदीची गोष्ट मुलांना सांगण्यात आली. तसेच नारळी पौर्णिमेचे महत्त्वदेखील विशद करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख योगिता टेमकर व शिक्षकांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound