जळगाव, प्रतिनिधी । डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, प्राथमिक विभागात आज गुरुवार दि १५ रोजी ऑनलाइन व्हाट्सअपच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला..
प्राथमिक विभागात वाचू आनंदे संकल्पनेतून वाचन प्रेरणा दिनाच्या सुरुवातीला डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्हाट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची माहिती तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ पाठवण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून इयत्ता १ लीतील विद्यार्थ्यांना शब्द इयत्ता- २ री तील विद्यार्थ्यांना लहान लहान वाक्य तसेच इयत्ता ३ री व ४ थीतील विद्यार्थ्यांसाठी हा गोष्ट वाचनासाठी देण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी उस्फूर्तपणे आवडलेली कविता वाचन केली व रसग्रहण केले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख केतन वाघ व सीमा जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.