यावल प्रतिनिधी । येथील नायब तहसीलदार रामकृष्ण पवार यांचे चिरंजीव डॉ. अक्षय पवार यांची नामांकीत हिन्दुजा हॉस्पीटल मुंबईत डीएम कार्डडीओलॉजी म्हणून निवड करण्यात आली. तर डॉ. रेणु अक्षय पवार यांचीही मुंबईतील कोकीळाबेन अंबानी हॉस्पीटलमध्ये डीएम गॅस्ट्रोलोजी करीता निवड झाली. यामुळे पवार कुटुंबाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणुन सेवेत कार्यरत असलेले रामकृष्ण पवार मुळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आभोडे खुर्द ता. रावेर या अगदी छोटयाशा गावातील रहिवाशी आहेत. निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा मुलगा डॉ. अक्षय पवार यांनी मुंबई येथील मधुन एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले. तर कोल्हापुर येथून आपले एमडी-मेडीसिनचे शिक्षण पुर्ण केले. डॉ. अक्षय पवार यांनी आदीवासी ग्रामीण क्षेत्रातून आपले शैक्षणिक कार्यपुर्ण केल्यानंतर मिळवलेले वैद्यकीय क्षेत्रातील यश हे लक्ष वेधणारे आहे. स्वर्गीय आदर्श शिक्षक रा.का.पवार गुरुजी व माजी शिक्षण अधिकारी एस.के.पवार त्यांचे मोठे बाबांचे मेहुणे डॉ. कृष्णा राठोड बालरोगतज्ञ जळगाव यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. पवार दामप्त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगीरीबद्दल प.पु. संतश्री लक्ष्मण चैतन्य बापुजी वृंदावन पाल ता. रावेर त्यांचे वडील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार व त्यांच्या आई निर्मला पवार व संपुर्ण कुटुंबासह यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुवर व सर्व महसुल अधिका-यांनी त्यांचे कौतूक करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.