यावल लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून डॉ. विवेक दिवाकर चौधरी व व्हाईस चेअरमन म्हणून बाळकृष्ण पंडित सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विकास सोसायटी डांभुर्णी निवडणुकीत शेतकरी पॅनेलचे १३ पैकी १३ उमेदवार निवडून आले आहे. याचे नेतृत्व डॉ.विवेक चौधरी व गुरुजी चौधरी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केले. या निवड प्रक्रियेत नवनिर्वाचित सदस्य प्रवीण पांडुरंग महाजन, उमाकांत भादलेसर, ललित शांताराम चौधरी, जितेंद्र सुरेश भंगाळे, रेडमीदास सरोदे, सुहास सरोदे, गोकुळ मुकुंदा कोळी, राजू दिनकर कोळी, भीमराव फालक, कांचन फालक यांनी सदस्य म्हणून सहभाग घेतला. नवनिर्वाचित चेअरमन डॉ. विवेक चौधरी यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करत असतांना सोसायटीच्या सर्वांगीण विकास हा शेतकऱ्यांचीही जोपासण्यासाठी आम्ही तन-मन-धनाने प्रयत्न करू संस्थेच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी व संस्थेला किती गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी संस्थेमार्फत शेतकऱ्याचे विकास संघ संबंधित नव नवीन उपाय योजना व उपक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले. ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी एम. टी. भारंबे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव म्हणून संजय महाजन तसेच भारंबे अप्पा यांनी सहकार्य केले. याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती पल्लवी चौधरी, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, हेमराज फालक, ललित फालक, जगन्नाथ चौधरी, अरुण चौधरी, मावळते चेअरमन अंकुश फालक, सुभाष फालक व ग्रामस्थ यांनी अभिंनदन केले आहे.