जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली आहे याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपरवरील चालक व मालक या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, (एमएच १९ सीवाय ९९९२) या क्रमांकाचे डंपर नशिराबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी 20 मार्च रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सुमारास वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई केली. डंपर तसेच दोन ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी बुधवारी सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक तुळशीराम जानकी राम कोळी रा.कासवा कठोरा ता.यावल व डंपर मालक प्रवीण बळीराम तायडे रा. कठोरा पोस्ट.फुलगाव, ता.भुसावळ या दोन जणांना विरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अलियार खान हे करीत आहेत.