डंपरच्या धडकेत परिचारिका जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी । हॉस्पिटलमधून काम आटोपून दुचाकीने घरी जाणार्‍या परिचारीकेच्या वाहनाला मागून येणार्‍या भरधाव डंपने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना येथे घडली.

जयाबाई बारी (काटोले) ह्या शहरातील रेल्वे स्टेशनरोड असलेल्या मशिद जवळ असलेल्या डॉ. अमिज जैन यांच्या रूग्णालयात परिचारीका म्हणून काम करत होत्या. काम आटोपून मोपेड गाडी क्रमांक (एमएच १९ सीके ६९१५) ने चाळीसगाव बसस्थानक जवळील हनुमान मंदीरासमोरून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारा डंपर (एमएच ४३, बीपी १७२६) ने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चाळीसगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असून हे वाहन चालक भरधाव वेगाने गजबजलेल्या ठिकाणाहून देखील वाहने चालवत असल्यामुळे असे अपघात नेहमीच घडत असतात वास्तविक शहराबाहेरून जाण्यासाठी बायपास असतानादेखील शहरात ही वाहने येतात कशी हा वाहतूक शाखेने गंभीरतेने घेण्याचा विषय आहे.


मृत जयाबाई बारी (काटोले)

Add Comment

Protected Content