ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठेवीच्या रकमा ठेवेदारांना देण्याच्या मागणाीसाठी जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समिती व  खान्देश ठेवीदार कृती समितीच्या वतीने मंगळवारी २० जून रोजी दुपारी १२ वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या गैरव्यवहारला सहकार विभागाने संरक्षण दिल्याने ठेवीदार आजपर्यंत वणवण फिरत आहे. तरीदेखील ठेवीदारांना संपुर्ण संरक्षण ठेवीच्या संदर्भात न देता त्यांना वेठीस धरण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने २००७ पासून ठेवीदारांच्या रकमा धनादेशच्या माध्यमातून देण्यात यावे. हे धानदेश २७ जून पर्यंत ठेवीदारांना अकाऊंट पेयी चेक पतसंस्थेनिहाय देण्यात यावे, काळा हनुमान, फैजपूर मर्चंट, गुरूदेव मर्चंट, जय श्रीराम, बहिणाबाई चौधरी या संस्थांसाठी विशेष अधिकारींची नेमणूक करण्यात यावी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सहकार कायदा दप्तर दिरंगाई केल्यास कारवाई करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी  जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समिती व  खान्देश ठेवीदार कृती समितीच्या वतीने  एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संध्या चित्ते आणि प्रविणसिहं पाटील यांनी केले.

Protected Content