जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाच्या पुरस्कार वितरणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे वृत्त आहे.
जैन उद्योग समूहातर्फे देण्यात येणार्या मस्वर्गीय अप्पासाहेब पवार कृषी उच्चतंत्र पुरस्कारफ सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांना प्रमुख उपस्थितीचे निमंत्रण जैन उद्योगाचे समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आला असून, १५ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर दोन्ही प्रमुख नेते प्रथमच जिल्ह्यात येणार आहेत.