Home Uncategorized ठाकरे पिता-पुत्रासह राऊत लवकरच जेलमध्ये जाणार : नारायण राणे

ठाकरे पिता-पुत्रासह राऊत लवकरच जेलमध्ये जाणार : नारायण राणे


राजापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव आणि आदित्य ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत हे लवकरच जेलमध्ये दिसणार असल्याचे भाकीत करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

राजापूर येथील कार्यक्रमात बोलतांना नारायण राणे यांनी ठाकरे गटावर घणाघाती टिका करतांनाच केंद्र व राज्य सरकारच्या कामांची वाखाणणी केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने कोकण विकासासाठी भरीव निधी दिला.

मात्र, गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यासह कोकणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने काय दिले ? असा प्रश्न उपस्थित करत कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. नारायण राणे पुढे म्हणाले की, आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागणार असल्याचे ते म्हणाले. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून शिवसेना आता संपलेली असल्याची खिल्ली देखील उडविली.


Protected Content

Play sound